Surprise Me!

Nashik | नाशकात पेरूच्या बागेत घ्या आस्वाद झणझणीत मिसळीचा

2021-12-11 665 Dailymotion

नाशकातल्या दरी मातोरी रोडवर प्रसिद्ध ठिकाण पेरूची वाडी हे ठिकाण आहे. आता इथे काय स्पेशल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र पेरूच्या बागेत बसून मस्त झणझणीत मिसळीवर ताव मारता आला तर...जिभेचा झणझणीतपणा घालवायला पेरूचं आईस्क्रीम, जिलबी, ताक, लस्सी यांची जोड आहे. नाशिकच्या मुंगसरा फाटा येथे हे पेरूची वाडी म्हणून मिसळीचं हॉटेल आहे. इथली स्वछता आणि चांगल्या प्रकारची गुणवत्ता यामुळे ग्राहक आकर्षित होत आहेत. सुंदर रंगसंगती आणि आकर्षक सजावट या पेरूच्या वाडी नावाच्या हॉटेलला आणखीनच शोभा आणतं. मग तुम्ही कधी येताय या मिसळीची चव चाखायला?

Buy Now on CodeCanyon